भडकेवाडीत अनोळखी तरुणाचा खून

By Admin | Published: January 21, 2015 12:17 AM2015-01-21T00:17:05+5:302015-01-21T00:20:58+5:30

शरीराचे दोन तुकडे : मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकला

Unknowing Blood Donor in Bhadkewadi | भडकेवाडीत अनोळखी तरुणाचा खून

भडकेवाडीत अनोळखी तरुणाचा खून

googlenewsNext

विटा : एका ३५ ते ४० वर्षांच्या अनोळखी पुरूषाचा खून करून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून ते पोत्यात भरून मृतदेह विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी १० वाजता खानापूर ते पेड रस्त्यावरील भडकेवाडी हद्दीत उघडकीस आली. विहिरीतील पोत्यात सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा खून गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
खानापूर ते पेड रस्त्यालगत भडकेवाडी हद्दीत वसंत चांगदेव बुर्ले यांची समाईकात विहीर आहे. आज मंगळवारी सकाळी १० वाजता ते विहिरीकडे गेले असता, एक पोते पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यावेळी बुर्ले यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांना ही माहिती मिळताच ते पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विहिरीतील पोते बाहेर काढल्यानंतर त्यात त्यांना पुरूषाच्या शरीराचा पोटापासूनचा खालचा भाग सापडला. त्यानंतर परिसरात आणखी शोध घेतला असता, विहिरीच्या काठावरच दुसरे पोते सापडले. त्यात अज्ञात व्यक्तीच्या शरीराचा उर्वरित दुसरा भाग असल्याचे निदर्शनास आले.
हा मृतदेह ३५ ते ४० वर्षांच्या पुरूषाचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने ओळख पटली नाही. शिवाय दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली होती. या घटनेने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. बुर्ले यांची विहीर खानापूर ते पेड रस्त्यालगत आहे. अज्ञात हल्लेखोराने खून करून मृतदेहाचे दोन तुकडे करून ते पोत्यात घालून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विटा पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांविरूध्द हवालदार एस. आर. चव्हाण यांनी फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल पोवार करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Unknowing Blood Donor in Bhadkewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.