अलकूड, ढालगावात विनापरवाना बैलगाडी शर्यती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:29 AM2021-03-23T04:29:22+5:302021-03-23T04:29:22+5:30

ढालगाव येथे दि. १७ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास ढालगाव ते हिवरे रस्त्यावर बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले ...

Unlicensed bullock cart race in Alkud, Dhalgaon | अलकूड, ढालगावात विनापरवाना बैलगाडी शर्यती

अलकूड, ढालगावात विनापरवाना बैलगाडी शर्यती

googlenewsNext

ढालगाव येथे दि. १७ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास ढालगाव ते हिवरे रस्त्यावर बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, तर दि. २१ रोजी सकाळी तालुक्यातील अलकूड (एस) येथील खडीचा माळ येथेही बैलगाडी शर्यती झाल्या. याबाबत सांगली येथील प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बेकायदेशीरपणे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली. दोन्ही ठिकाणी बैलगाडी शर्यती आयोजित करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करून तातडीने सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

अलकूड (एस) येथील शर्यतीप्रकरणी आयोजक अर्जुन कृष्णा भोसले, सारीष चौगुले, भावड्या दुधाळ (सर्व रा. अग्रण धूळगाव) या तिघांना, तर ढालगाव येथील बैलगाडी शर्यतीचे आयोजक नवनाथ लोभा खुटाळे, रणजित पाटील व संभा कोनूर (सर्व रा. ढालगाव) यांना ताब्यात घेतले आहे. समाधान जगन्नाथ सरगर (रा. ढालगाव) फरारी झाला आहे.

पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Unlicensed bullock cart race in Alkud, Dhalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.