अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:05 PM2021-01-04T13:05:04+5:302021-01-04T13:12:15+5:30

तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी भरेल, अशीच परिस्थिती आहे. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पण तांबेऱ्यासह बुरशीचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

Untimely rains hit vineyards hard | अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी

अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात रिमझिम पाऊस

सांगली : तासगाव, कडेगाव, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षबागायतदारांच्या उरात धडकी भरेल, अशीच परिस्थिती आहे. अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. पण तांबेऱ्यासह बुरशीचा फैलाव होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी साडेअकरानंतर तासगाव, कडेगाव, पलूस, वाळवा आणि खानापूर तालुक्यात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सकाळी वायफळे, आरवडे येथे पाऊस झाला. कडेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून नेवरी परिसरात पावसाने हजेरी लावली.

वाळवा तालुक्यातील बोरगाव, ताकारी, नवेखेड, जुनेखेड, फार्णेवाडी, मसुचीवाडी, वाळवा आणि बागणी परिसरात रिमझिम पाऊस पडला. परिणामी परिसरातील ऊस तोडी ठप्प झाल्या. पलूस तालुक्यातील पुणदी, नागराळे परिसरातही पावसाने हजेरी लावल्यामुळे ऊस तोडी थांबल्या. दुधोंडी येथेही तुरळक सरी पडल्या.

अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेला द्राक्ष हंगाम अडचणीत आला आहे. घडामध्ये पाणी साचल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार केली जाणारी द्राक्षे मणी तडकल्याने नुकसानीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष मण्यातील तयार साखर कमी होण्याची भीती बागायतदार महादेव पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Untimely rains hit vineyards hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.