उरुण इस्लामपूर येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:31+5:302021-04-17T04:25:31+5:30

इस्लामपूर येथे डॉ. साकेत पाटील यांना निवेदन देताना सचिन कोळी, स्वरूप मोरे यांनी निवेदन दिले. यावेळी अभिजित रासकर, दादासाहेब ...

Urun demands start of vaccination at Islampur | उरुण इस्लामपूर येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी

उरुण इस्लामपूर येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी

googlenewsNext

इस्लामपूर येथे डॉ. साकेत पाटील यांना निवेदन देताना सचिन कोळी, स्वरूप मोरे यांनी निवेदन दिले. यावेळी अभिजित रासकर, दादासाहेब सूर्यवंशी, सागर जाधव उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोरोना प्रतिबंधक लस वाढीव प्रमाणात द्यावी. तसेच उरुण इस्लामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करावे, अशी मागणी इस्लामपूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी यांनी डॉ. पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्यासमवेत कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, उपाध्यक्ष अभिजित रासकर, संघटक सागर जाधव, चिटणीस दादासाहेब सूर्यवंशी, प्रथमेश पाटील, दिगंबर रासकर, मिलिंद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या जिल्हा उपरुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लस द्यायचे काम सुरू आहे. मात्र, येथे कोविड सेंटर असून, कोरोनाबाधित रुग्ण तपासणीसाठीही येत आहेत. त्यामुळे येथे गर्दी होत असून, ती कोरोनाच्या प्रसारास पूरक आहे. तरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून लस वाढवून द्यावी, तसेच उरुण इस्लामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Urun demands start of vaccination at Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.