चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

By admin | Published: June 15, 2017 10:58 PM2017-06-15T22:58:03+5:302017-06-15T22:58:03+5:30

चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

Use of auto rickshaw in four divisions | चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

चार प्रभागांत रिक्षा घंटागाडीचा प्रयोग

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी चार प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर रिक्षा घंटागाडी सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर नवी मुंबई, पुणे, नाशिक महापालिकांच्या प्रकल्पांच्या पाहणीसाठी तीन दिवसांचा दौरा करण्यावर यावेळी शिक्कामोर्तब झाले.
महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा प्रकल्पाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर विजय घाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नगरसेवक शेखर माने, रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत मजलेकर, संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, निर्मला जगदाळे, मृणाल पाटील उपस्थित होते.
या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अतिरिक्त कर्मचारी, घंटागाड्यांची संख्या वाढविणे, कंटेनरची संख्या यावर चर्चा झाली. नागरी वस्तीपासून दूर असणाऱ्या खुल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी घरा-घरातून गोळा होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा वर्गीकरण करून खत निर्मितीसाठी सुका कचरा थेट कचरा डेपोवर नेता येईल. घरा-घरातला कचरा उचलण्यासाठी डस्टबिन देण्यात यावे, यासाठी सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून हे कचरा डबे देण्याचा निर्णय झाला.
या बैठकीत दोन प्रभागात खासगी एजन्सीमार्फत दोन घंटागाड्या आणि दोन प्रभागात महापालिका पातळीवर दोन रिक्षा घंटागाड्या सुरु करण्याबाबत एकमत झाले.
यात खर्च जास्त कशासाठी येतो, याचा अंदाज घेऊन पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. कचरा उठाव, वाहने, चालक यांचा प्रायोगिक तत्त्वावर ठेका देण्यासंबंधीही चर्चा झाली. महापालिकेमार्फत हे चालवले तर किती खर्च येईल आणि खासगी एजन्सीमार्फत चालवले तर किती खर्च येईल, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त सुनील पवार यांना दिले.
सदस्य शेखर माने यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा उठावाचे उद्दिष्ट द्या, असे सुचवले. राज्यात नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणी घनकचरा प्रकल्प सुरु आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी दि. २८, २९ आणि ३० जून रोजी दौरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कचरा वर्गीकरणाच्या कामास तयारी
घनकचरा बैठकीसाठी हिंंद मजदूर सभेच्या कचरा वेचणाऱ्या महिलांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांनी कचरा डेपोवर कचरा वर्गीकरण करण्याचे काम करायला तयार असल्याचे सांगितले. या महिलांना याबदल्यात मोबदला द्यायचा की वर्गीकरण केलेला कचरा द्यायचा, याबाबतचा निर्णय आरोग्य अधिकाऱ्यांना घेण्याचे आदेश दिले. यासंदर्भात दोन दिवसात कचरा वेचक महिला प्रतिनिधींबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Web Title: Use of auto rickshaw in four divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.