शिराळा नगरपंचायतच्या वतीने फवारणीसाठी कालबाह्य औषधांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:02+5:302021-04-26T04:23:02+5:30
ओळ : शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सचिन कोकाटे यांना फवारणीसाठी कालबाह्य औषधांचा वापर होत आहे, दोषींवर कारवाई करावी या मागणीचे ...
ओळ : शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सचिन कोकाटे यांना फवारणीसाठी कालबाह्य औषधांचा वापर होत आहे, दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतच्या वतीने सध्या करण्यात येत असलेल्या फवारणीसाठी कालबाह्य औषधांचा वापर केला जात असून, याबाबत नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांना शिराळा तालुका शिवसेना व युवासेना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात सध्या डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे रोग आणि त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरू आहे. याबाबत स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन नगरपंचायत कर्मचारी फवारत असलेल्या औषधांची आम्ही माहिती घेतली. यामध्ये असे दिसून आले की, डेलफॉग नावाचे जे औषध आहे त्याची मुदत २३ मार्च २०२१ रोजी संपलेली आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी फवारणी करत असलेल्या ठिकाणी स्वच्छता कामगार, ठेकेदार व फवारणी कामगार ठेकेदार यांना बोलावून घेतले.
या प्रकरणात जबाबदार व दोषी असलेल्यांवर तहसीलदारांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष हिरुगडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख स्वप्नील निकम, उपशहर प्रमुख अभिजित दळवी, योगेश खुर्द, शिवसैनिक उपस्थिती होते.
कोट
औषध फवारणीसाठी आणलेली औषधी वेळोवेळी फवारणी करून संपवण्यात येतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या नजरचुकीने डेलफॉग नावाचे फक्त एक लिटरचेच औषध शिल्लक राहिले होते. कामगारांनी रात्रीच्या वेळी घाईगडबडीमध्ये सदर औषध बाटली फवारणीसाठी घेतली होती. ही बाब लक्षात येताच हे औषध फवारणी करण्यासाठी वापरले नाही.
-योगेश पाटील.
मुख्याधिकारी, नगरपंचायत, शिराळा