कोविड सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:00+5:302021-05-16T04:25:00+5:30

सांगली : कोविड सेवेसाठी कार्यरत शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांनी दिले आहेत. ...

Vaccinate government employees in the Kovid service with priority | कोविड सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा

कोविड सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा

Next

सांगली : कोविड सेवेसाठी कार्यरत शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांनी दिले आहेत. सध्या लस टंचाईच्या काळात अनेक विभागांना लसीपासूनच वंचित रहावे लागत असल्याने या आदेशाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

लाभार्थी विभाग असे : महावितरण, न्यायालय, कृषी, औद्योगिक न्यायालय, ग्राहक मंच, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, कोषागार, आरटीओ, एसटी, वन, रेल्वे, जीएसटी, कारागृह, रेशनिंग दुकानदार, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, उत्पादन शुल्क व टपाल विभाग.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे की, या विभागांचे अधिकारी व कर्मचारी कोविड काळात अखंड सेवेत आहेत. त्यांचे लसीकरण प्राधान्याने केले जावे. या विभाग प्रमुखांनी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांना द्यावे. आरोग्य विभागाने प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करुन लसीसाठी नोंदणी करावी. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे.

Web Title: Vaccinate government employees in the Kovid service with priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.