सावली केंद्रातील बेघरांना लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:56+5:302021-04-21T04:25:56+5:30
सांगली : सावली बेघर निवारा केंद्रातील ६२ लोकांना कोरोना प्रतिबंधक लस का दिली नाही, असा सवाल करीत त्यांना तातडीने ...
सांगली : सावली बेघर निवारा केंद्रातील ६२ लोकांना कोरोना प्रतिबंधक लस का दिली नाही, असा सवाल करीत त्यांना तातडीने लस द्यावी, अशी मागणी नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
घोडके म्हणाले की, सावली बेघर निवारा केंद्रातील लोकांना मागील वर्षात कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते यातून बाहेर पडले. बेघर, उपेक्षित म्हणून त्यांना महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात सहारा दिला आहे. त्यांची सेवा येथील सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. कोरोनाची आता दुसरी लाट आली आहे. त्याचा कहर जिल्हा अनुभवत आहे. अशा स्थितीत या बेघरांना प्राधान्याने लस देणे गरजेचे होते. ४५ वर्षांवरील बहुतांश लोक येथे आहेत. त्यामुळे आजपर्यंत यांना लस का दिली गेली नाही. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे का लक्ष दिले नाही. वंचित, उपेक्षित असलेल्या या घटकांना लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करावे, अशी मागणी त्यांनी केली.