जिल्ह्यात १२,८४५ जणांचे लसीकरण, दुसऱ्या डोसला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:26 AM2021-05-14T04:26:38+5:302021-05-14T04:26:38+5:30
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १२ हजार ८४५ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. शुक्रवारी फक्त ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे दुसऱ्या ...
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १२ हजार ८४५ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. शुक्रवारी फक्त ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू राहणार आहे.
१८ ते ४५ वर्षांच्या एकाही तरुणाला गुरुवारी लस मिळाली नाही. शासनाच्या आदेशानुसार ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार या वयोगटातील ३,५४५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. ७३१ जणांना पहिला डोस मिळाला. ६० वर्षांवरील ५५५ जणांना पहिला डोस तर ७,१७१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात १२,८४५ जणांचे लसीकरण झाले पैकी ग्रामीण भागात १०,६४२, निमशहरी भागात १,६५९ तर महापालिका क्षेत्रात ५४४ जणांचे लसीकरण झाले.
आजअखेर ५,३३,३४७ जणांना पहिला तर १,०८,८८० जणांना दुसरा डोस मिळाला आहे. एकूण लसीकरण ६,४२,२२७ वर पोहोचले.