जामवाडी आरोग्य केंद्रामध्ये १४ हजार ५०० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:21+5:302021-07-19T04:18:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या जामवाडी आरोग्य केंद्रात आतापर्यंत साडेचौदा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आयुक्त नितीन कापडणीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या जामवाडी आरोग्य केंद्रात आतापर्यंत साडेचौदा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या लसीकरण केंद्राला भेट देत लसीकरण मोहिमेची पाहणी केली.
यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. वर्षा पाटील उपस्थित होत्या. जामवाडी आरोग्य केंद्राकडून ९१२३ जणांना पहिला डोस, तर ५६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. ६५ वर्षांवरील ४३०० आणि १८ वर्षांवरील २५०० लोकांचे लसीकरण करण्यात आले. याचबरोबर परदेशी जाणाऱ्या ७५, फ्रंटलाईन वर्कर १२७०, हेल्थ केअर वर्कर ४९० जणांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी डॉ. वर्षा पाटील, तेजस्विनी वाघमारे, सीमा शिंदे, आसमा मुलाणी, जयश्री कुंभार, ज्योत्स्ना माने, डाटा एंट्री ऑपरेटर विकास माने, अनिता कदम, महेश संकपाळ, शिक्षक अश्विनी माळी, सफिया सुतार, विक्रम ठाकरे, महेश साळुंखे, अश्विन चौगुले, रोहिदास कोलप यांचे सहकार्य लाभले.