बागणी आरोग्य केंद्रात ४,९८३ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:09+5:302021-04-16T04:27:09+5:30
बागणी : बागणी (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकराणाचा वेग घेतला आहे. आजअखेर चार हजार ९८३ नागरिकांचे लसीकरण झाले ...
बागणी : बागणी (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकराणाचा वेग घेतला आहे. आजअखेर चार हजार ९८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग घेतला असून, नागरिकांचेही सहकार्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी, फाळकेवाडी, ढवळी, कोरेगाव, फार्णेवाडी, शिगांव व भडकंबे अशी गावे बागणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येत आहेत. या सर्व केंद्रावर ४५ वयोगटांच्या वरील आठ हजार ८५६ नागरिक असून, चार हजार ९८३ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त लसीकरण भडकंबे गावचे असून, सर्वांत कमी सहभाग रोझावाडी गावचा आहे. लसीकरणासाठी नागरिकांमधून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांची गर्दी होत आहे. लोकांची नोंदणी करण्यासाठी लागणारा कालावधी लागत आहे. वाढत्या गर्दीला शिस्त लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी थांबून आरोग्य यंत्रणेला मदत करण्याची गरज आहे.