कामेरीत ८७ टक्के ज्येष्ठांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:47+5:302021-05-16T04:24:47+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे ४५ वयावरील ८७.४५ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. ...
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे ४५ वयावरील ८७.४५ टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. ३१.६३ टक्के नागरिकांना दुसरा डोस दिला आहे. शासन आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्यापही सुरू केले नसल्याची माहिती कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
कामेरी येथे १४ मेअखेर २३२ कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कामेरीचा मृत्युदर २.५८ टक्के आहे. त्यामुळे कामेरी येथे १०० टक्के लसीकरण व्हावे म्हणून आशा, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने डॉ. किरण माने, आरोग्य सहायक व्ही. एस. कोरे, एम. बी. कोरे, आर. एम. माने, एस. एल. धनवडे, एस. पी. आमने, ए. ए. पाटील हे लसीकरण मोहीम राबवीत आहेत.