जिल्ह्यात लसीकरण मंदावले, फक्त दुसरा डोस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:49+5:302021-05-16T04:25:49+5:30
सांगली : कोरोनाचे लसीकरण जिल्हाभरात मंदावले आहे. तीन दिवसांपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात फक्त १,४७२ मात्रा ...
सांगली : कोरोनाचे लसीकरण जिल्हाभरात मंदावले आहे. तीन दिवसांपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात फक्त १,४७२ मात्रा टोचण्यात आल्या.
१८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण पूर्णत: बंद आहे. ४५ ते ५९ व ६० वर्षांवरील नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यासाठीदेखील पुरेशी लस उपलब्ध नाही. शनिवारी १८३ जणांना पहिला डोस व १,२८९ जणांना दुसरा डोस मिळाला. ग्रामीण भागात ९३७, निमशहरी भागात ५३५ जणांना लस मिळाली. महापालिका क्षेत्रात कोठेच लसीकरण झाले नाही. आजवरचे एकूण लसीकरण ६ लाख ४६ हजार ९४७ वर पोहोचले. खासगी रुग्णालयांनी थेट कंपन्यांकडून लस विकत घेण्यास सांगितल्याने त्यांच्याकडेही लस उपलब्ध नाही. कोरोनाचा धोका वाढत असताना नागरिकांना लसीसाठी धावाधाव करावी लागत आहे.