लस संपल्याने जिल्ह्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:55+5:302021-04-24T04:27:55+5:30

शनिवारी संध्याकाळी लस मिळण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. दिवसभरात ६५१७ जणांना लस देण्यात आली. मंगळवारी लसीचे ४५ ...

Vaccination halted in the afternoon in the district due to lack of vaccination | लस संपल्याने जिल्ह्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

लस संपल्याने जिल्ह्यात दुपारनंतर लसीकरण ठप्प

Next

शनिवारी संध्याकाळी लस मिळण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. दिवसभरात ६५१७ जणांना लस देण्यात आली. मंगळवारी लसीचे ४५ हजार डोस मिळाल्याने गुरुवारपर्यंत गतीने लसीकरण झाले. गुरुवारी संध्याकाळी अवघे सात हजार डोस शिल्लक राहिले. त्याच्या आधारे शुक्रवारी दुपारपर्यंत कसेबसे लसीकरण सुरू राहिले. आरोग्य विभागाने गुरुवारीच दोन लाख लसींची मागणी नोंदविली होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ती उपलब्ध होण्याची अपेक्षा होती, पण मिळाली नाही. महापालिका क्षेत्रातील तीस केंद्रांवर दुपारी लस संपली. नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले. दुसऱ्या डोससाठी आलेल्यांचेही लसीकरण होऊ शकले नाही. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतही लसीकरण थांबले.

लसीसाठी शनिवारी गाडी पाठविण्याची सूचना मिळाली आहे, त्यामुळे सकाळी सांगलीतून व्हॅन निघेल. लस घेऊन येण्यास संध्याकाळ होणार आहे. त्यामुळे शनिवारीही लसीकरण बंद राहणार आहे. रविवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

चौकट

शुक्रवारचे लसीकरण असे :

ग्रामीण भाग ४,२५०

निमशहरी भाग ९५३

महापालिका क्षेत्रात ७७३

खासगी रुग्णालये ५४१

शुक्रवारचे एकूण लसीकरण - ६,५१७

आजवरचे एकूण लसीकरण ४,८०,०३६

आजवर मिळालेले एकूण डोस - ४ लाख ९० हजार

Web Title: Vaccination halted in the afternoon in the district due to lack of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.