जिल्ह्यात लसीकरणाने गती घेतली, ११८२ ज्येष्ठांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:42+5:302021-03-05T04:26:42+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने गुरुवारी गती घेतली. साठ वर्षांवरील ११८२ ज्येष्ठांना आतापर्यंत लस टोचण्यात आली. तर, ४५ ते ...
सांगली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने गुरुवारी गती घेतली. साठ वर्षांवरील ११८२ ज्येष्ठांना आतापर्यंत लस टोचण्यात आली. तर, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १७१ व्याधीग्रस्तांचे लसीकरण झाले. शिवाय ३३० आरोग्य कर्मचारी व १४० फ्रंटलाईन वर्कर्स यांचेही गुरुवारी लसीकरण झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे व लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व म्हणजे ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू होईल. सध्या एका खासगी रुग्णालयात लसीची सोय झाली आहे. त्याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा ३८ केंद्रांमध्ये लस टोचली जात आहे. खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू असून प्रामुख्याने लस साठविण्यासाठी सोय असल्याची पाहणी केली जात आहे.