राज्यातील औषध विक्रेत्यांना प्राधान्याने लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:06+5:302021-03-19T04:25:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना काळात राज्यातील औषध विक्रेत्यांनी (फार्मासिस्ट) अहोरात्र काम केले आहे. त्यांच्या आरोग्यसेवेचा विचार करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात राज्यातील औषध विक्रेत्यांनी (फार्मासिस्ट) अहोरात्र काम केले आहे. त्यांच्या आरोग्यसेवेचा विचार करून त्यांना प्राधान्याने कोविड लस द्यावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले. टोपे यांनी याबाबत लवकरच आदेश देण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात राज्यातील औषध दुकानांमधील फार्मासिस्टनी मोठी सेवा बजावली आहे. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. हा धोका लक्षात घेऊन फार्मासिस्टना प्राधान्यक्रमाने लस देण्याची व्यवस्था करावी. सांगली जिल्ह्यातील ३८०० हून अधिक औषध दुकानांमध्ये सेवा देणाऱ्या फार्मासिस्टना तत्काळ लस देण्याचा पायलट प्रोजेक्ट राबवावा, अशी मागणी केली. त्यास टोपे यांनी प्रतिसाद देत फार्मासिस्टना प्राधान्याने लस देऊ, असे सांगितले.
टोपे यांच्या आदेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या फार्मासिस्टना लाभ होईल, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.