लस संपली, आता पुन्हा प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:02+5:302021-05-25T04:31:02+5:30

सांगली : सोमवारी दिवसभरात १३ हजार ५४२ जणांना कोरोनाची लस मिळाली. १३ हजार ३४९ जणांना पहिला डोस मिळाला, तर ...

Vaccines run out, now wait again! | लस संपली, आता पुन्हा प्रतीक्षा!

लस संपली, आता पुन्हा प्रतीक्षा!

Next

सांगली : सोमवारी दिवसभरात १३ हजार ५४२ जणांना कोरोनाची लस मिळाली. १३ हजार ३४९ जणांना पहिला डोस मिळाला, तर १९३ जणांचे दुसरे लसीकरण झाले. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटाचे ७६६४ लाभार्थी होते. ६० वर्षांवरील ४,७२७ जणांना लस देण्यात आली.

ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे १० हजार ३७५ जणांना लस मिळाली. निमशहरी भागात १,७०० जणांचे तर महापालिका क्षेत्रात फक्त १,४६७ जणांचे लसीकरण झाले. आजअखेरचे एकूण लसीकरण ६ लाख ७० हजार २०७ इतके झाले आहे. रविवारी १४ हजार ८०० डोस मिळाले होते, त्यातील १३ हजार ३४९ सोमवारी एका दिवसातच संपले, त्यामुळे मंगळवारी लसीकरण अवघे तासभरच चालणार आहे. महापालिकेला ३००० लसी देण्यात आल्या होत्या, त्यादेखील संपल्या आहेत.

Web Title: Vaccines run out, now wait again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.