वैभव हाके यांचा गहू उत्पादनात तालुक्यात दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:56+5:302021-07-03T04:17:56+5:30
कृषी दिनानिमित्त वैभव हाके यांचा सत्कार कृषी अधिकारी भगवानराव माने यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : ...
कृषी दिनानिमित्त वैभव हाके यांचा सत्कार कृषी अधिकारी भगवानराव माने यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील वैभव धोंडिराम हाके यांनी राज्यस्तरीय रब्बी हंगाम अंतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत गहू पिकात हेक्टरी ५७ क्विंटल ७१२ ग्रॅम उत्पन्न मिळवून वाळवा तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला.
हाके म्हणाले, तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवळीचे खत, माती नमुना, पूर्वमशागत, बियाणे निवड, पेरणी, जमीन, आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी वेळोवेळी कृषी सहायक सावित्री आटूगडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच मंडळ कृषी अधिकारी आष्टा निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक घाटगे यांचेही मार्गदर्शन लाभले.
सरपंच पद्मजा कबाडे, उपसरपंच माणिक लवटे, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, सुधीर पाटील, प्रगतिशील शेतकरी सुरेश कबाडे, तलाठी उपाध्ये, ग्रामसेवक बिरनाळे, पोलीस पाटील विजया पाटील यांचा समावेश करून मंडळ कृषी अधिकारी खारगे, पर्यवेक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गहू पिकाचे विक्रमी उत्पादन मिळाले. कृषी दिनानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला.