बांधकामे पूर्णत्वात कार्यकारी अभियंत्यांचे मोलाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:50+5:302021-05-06T04:27:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांची कामे पूर्णत्वास नेण्यात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांची कामे पूर्णत्वास नेण्यात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ यांचे मोलाचे योगदान लाभले, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र मिसाळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांच्याहस्ते करण्यात आला.
डुडी म्हणाले, बांधकाम विभागातील बहुतांशी कामे प्रलंबित होती, रस्ते आणि पुलांची कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अपूर्ण कामांबाबत कार्यकारी अभियंता मिसाळ मार्ग काढत पूर्णत्वास नेली आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यास त्यांनी मदत केली आहे.
यावेळी माजी सभापती अरुण राजमाने, सरदार पाटील, संजीवकुमार पाटील, अरुण बालटे,अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, विजयसिंह जाधव, डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता दादासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.