वाळवा- शिराळा दूध संघ सहकारातील आदर्श ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:24+5:302020-12-30T04:35:24+5:30

यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस संघाचे प्रथम सभासद झाले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय ...

Valva- Shirala Dudh Sangh will be a role model in cooperation | वाळवा- शिराळा दूध संघ सहकारातील आदर्श ठरेल

वाळवा- शिराळा दूध संघ सहकारातील आदर्श ठरेल

Next

यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस संघाचे प्रथम सभासद झाले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, आ. अमल महाडिक, शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांनी ही शेअर्स रक्कम भरून सभासदत्व स्वीकारले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संघामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून, त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध होणार आहे. ही संस्था जिल्ह्याच्या सहकारातील आदर्श दूध संघ म्हणून नावलौकिक करेल.

राहुल महाडिक म्हणाले, वाळवा व शिराळ्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी व दूध उत्पादकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. हा दूध संघ दूध उत्पादक व सभासद यांना योग्य तो न्याय देणारा ठरेल.

सम्राट महाडिक म्हणाले, वनश्री नानासाहेब महाडिक यांचे सहकारी संस्था उभारणीचे स्वप्न पूर्ण होत आहे. येणाऱ्या काळात या संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना प्रोत्साहन व संकलन वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, समरजित घाटगे, दीपक शिंदे, राजेंद्र देशमुख, दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, सभापती जगन्नाथ माळी, स्वरूपराव पाटील, निजाम मुलाणी, मारुती खोत, सतीश महाडिक, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, चेतन शिंदे, केदार नलवडे, शंकर पाटील, डी. के. कदम, इंद्रजित पाटील उपस्थित होते.

फोटो - २८१२२०२०-आयएसएलएम-वाळवा-शिराळा दूध न्यूज

फोटो ओळ : पेठनाका येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाळवा-शिराळा दूध संघाच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, समरजित घाटगे उपस्थित होते.

Web Title: Valva- Shirala Dudh Sangh will be a role model in cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.