कोरोना लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत नोडल, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्याची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 03:01 PM2021-04-02T15:01:23+5:302021-04-02T15:04:24+5:30
corona virus Zp Sangli- सांगली जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींची लसीकरणाची प्रक्रिया दि. 1 एप्रिल 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
सांगली : सांगली जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींची लसीकरणाची प्रक्रिया दि. 1 एप्रिल 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहेतच. तसेच उपकेंद्राच्या ठिकाणी देखील लसीकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
लसीकरणासाठी क्षेत्रीय स्तरावरील विविध घटकांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून यामध्ये सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल इत्यादींना 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी को-विन वेब पोर्टल वर नोंदणी करणे व त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र स्तरावर लसीकरण करण्यासाठी नियोजन करणे, नागरिकांनी सोबत घेवून जावयाच्या कागदपत्रांबाबत माहिती देणे, ग्रामदक्षता समितीने गावामध्ये लसीकरणाबाबत प्रबोधन करणे आदि जबाबदाऱ्या सोपेविण्यात आल्या आहेत.
विस्तार अधिकारी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, केंद्र चालक-अररङ, ग्राम दक्षता समिती इत्यादींना घरभेटी आयोजित करून पात्र व्यक्तींना नोंदणी व लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, घंटागाड्याव्दारे लसीकरण मोहिमेबाबत ऑडिओ क्लिपव्दारे संदेश देणे, गावामध्ये दर्शनी भागामध्ये कोविड-19 लसीकण मोहिमेची प्रसिध्दी बॅनर्स, होर्डिंग्जच्या माध्यमातून करणे, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक इत्यादींनी ऑनलाईन माध्यमाचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना लसीकरण करण्यासाठी संदेश देणे आदि विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
गृहभेटी करून पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर पाठविणे, पात्र व्यक्तींना नेमून दिलेला लसीकरणाचा दिवस, ठिकाण, लसीकरणाची प्रक्रिया यांची माहिती देणे, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गृहभेटी देवून मोहिमेसंदर्भात माहिती देवून लसीकरणासाठी प्रवृत्त करणे व लसीकरण केंद्रावर मदत करणे, विस्तार अधिकारी (आरोग्य), आरोग्य सहाय्यक, ए.एन.एम., आशा स्वयंसेविका यांनी मोहिमेसंदर्भात माहिती देवून लसीकरणासाठी प्रवृत्त करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र निहाय लसीकरणाचे नियोजन आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे संनियंत्रण करणे व सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण होईल याची दक्षता घेणे आदि विविध जबाबदाऱ्या नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.