जिल्ह्यातील १६ खेळाडूंना वसंतदादा क्रीडा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:51+5:302021-02-27T04:35:51+5:30

शिक्षण विभागाकडून वसंतदादा क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांतून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर निवड समितीची बैठक ...

Vasantdada Sports Award to 16 players from the district | जिल्ह्यातील १६ खेळाडूंना वसंतदादा क्रीडा पुरस्कार

जिल्ह्यातील १६ खेळाडूंना वसंतदादा क्रीडा पुरस्कार

Next

शिक्षण विभागाकडून वसंतदादा क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांतून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर निवड समितीची बैठक अध्यक्षा कोरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिक्षण सभापती आशा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी शिक्षणाधिकारी राहुल गावडे, क्रीडा अधिकारी प्रशांत उपस्थित होते.

२०१९-२०२० या वर्षासाठी पुरस्कारप्राप्त खेळाडू : प्राजक्ता प्रकाश पवार (खो-खो- वाळवा), श्रेयश संभाजी तांबवेकर (तलवारबाजी -हरिपूर, ता. मिरज) प्रतीक्षा रामदास बागी (कुस्ती- तुंग, ता. मिरज), श्रेयश कृष्णात जाधव (खो-खो -कवठेपिरान, ता. मिरज), सोनाली सुदर्शन जाधव (किकबॉक्सिंग- भोसे, ता. मिरज), प्रीती राजेंद्र बाणेकर (बॉक्सिंग- इस्लामपूर), आशितोष शशिकांत पवार (खो-खो- कवठेपिरान, ता. मिरज), नेहा हेमंत शिंदे (व्हॉलिबॉल- इस्लामपूर) व क्रीडा मार्गदर्शक म्हणून हमजेखान मुबारक मुजावर (समडोळी-ता. मिरज) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

२०२०-२०२१ या वर्षासाठी योगेश्वरी महादेव कदम (जलतरण - सांगलीवाडी, ता. मिरज), सूरज शीतल लांडे (खो-खो- दुधगाव, ता. मिरज), अक्षता माणिक होळकर (मैदानी- नागज, ता. कवठेमहांकाळ), साहील हमजेखान मुजावर (कराटे, समडोळी, ता. मिरज), स्नेहा अनिल फाळके (तायक्यांदो- चरण, ता. शिराळा), शंतनु तुषार शिंगारे (तायक्वांदो - येलूर, ता. वाळवा), नीलम नारायण साळुंखे (व्हॉलिबॉल- माळवाडी, ता. मिरज), मुक्ता रमेश लांडगे (जलतरण, सांगली). दिव्यांग खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांमध्ये रामदास धनपाल कोळी या मैदानी आंतरराष्ट्रीय खेळाडूस विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय क्रीडा मार्गदर्शक अरुण रमेश रेळेकर (चरण, ता. शिराळा) यांना जाहीर करण्यात आला.

Web Title: Vasantdada Sports Award to 16 players from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.