वसंतदादा साखर कारखाना ५२ कोटी भरणार
By admin | Published: March 12, 2016 12:15 AM2016-03-12T00:15:33+5:302016-03-12T00:20:02+5:30
जिल्हा बँक : कर्ज वसुलीसाठी मोहीम तीव्र करण्याचे अध्यक्षांचे आदेश
पदभार स्वीकारला : सुलभा खोडके यांची उपस्थिती
अमरावती : स्थायी समिती सभापतीपदाचा टोकाचा वाद, निर्माण झालेला दबावगट, त्यात आमच्या नेत्यांची परिपक्वता व दिलेला शब्द खरा करण्याची हातोटी, यामुळेच तब्बल तिसऱ्यांदा आपण स्टॅँडिंग चेयरमन म्हणून पदभार स्वीकारल्याचे अविनाश मार्डीकर यांनी शुक्रवारी सांगितले. मूलभूत सुविधांवर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी मार्डीकर सभापती म्हणून अविरोध निवडून आल्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी आमदार सुलभा खोडके यांच्यासह माजी महापौर मिलींद चिमोटे,आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची उपस्थिति होती. प्रशासनाच्या सहकार्याने लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. आ. सुनील देशमुख यांच्या मदतीनेच आपली अविरोध निवड झाली. त्यामुळे त्यांचेही आभार मानलेच पाहिजे, असे मार्डीकर म्हणाले. काटेरी मुकुट घातला आहे, मात्र आम्ही कार्य करुन दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शुभेच्छुकांची गर्दी
माजी आमदार सुलभा खोडके, महापौर रिना नंदा यांच्या उपस्थितीत मार्डीकर यांनी स्थायी सभापति म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, नगरसेवक प्रदीप बाजड, चेतन पवार, मिलींद बांबल, निलीमा काळे, हमीद शद्दा, माजी महापौर किशोर शेळके, यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मार्डीकर यांना शुभेच्छा दिल्या.
मार्डीकर यांच्याशी माझी ट्यूनिंग जमेल, असा आशावाद आयुक्तांनी व्यक्त केला.
सभापती म्हणून सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडायचा आहे. पाचही झोन मधील रस्ते डांबरीकरणासाठी ५ कोटींची तरतूद हवी. या शिवाय पालिकेची ठोस पावले उचलली जातील. मोठे आव्हान पेलायचे आहे. पाणीपुरवठा आणि मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल.
- अविनाश मार्डीकर, सभापती, स्थायी समिती.
आम्ही शब्द पाळतो- सुलभा खोडके
शेखावतांनी घेतलेली टोकाची भूमिका अमरावतीकरांनी अनुभवली. मात्र आम्ही करारावर ठाम होतो. प्रदेशाध्याक्षांनीही आमचीच बाजू उचलून धरली. आम्ही शब्द देतो, तो खरा करतो, त्याला जाणतो, असे माजी आ. सुलभा खोडके यांनी गेल्या १५ दिवसांच्या वादावर भाष्य केले. मार्डीकरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तथा आ. सुनील देशमुख व मिलींद चिमोटे यांचे आभारही मानले.
विकासाला साथ- मिलिंद चिमोटे
आमचे नेते आ. सुनील देशमुख यांनी राकॉंफ्रंटला मदत करुन विकासालाच साथ दिली आहे. शहराला स्वच्छ आणि पारदर्शी कारभार देण्यासाठी मार्डीकर यांना पर्यायाने खोडके गटाला पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी व्यक्त केली.