वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:19+5:302021-02-13T04:26:19+5:30
डॉ. हुजरे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करा. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या संस्कारकेंद्राचे नाव उज्वल करा ...
डॉ. हुजरे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करा. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या संस्कारकेंद्राचे नाव उज्वल करा व सुसंस्कारी डॉक्टर तयार करावा.
डॉ. बदामे यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉ. ए. एन. अंभोरे यांचे रसायन शास्त्रातील पेटंट केंद्र सरकारने मान्य केले. डॉ. स्वाती जाधव यांनी रसायनशास्त्रातील पुस्तक लेखनाचे काम केले आहे. डॉ. अर्जुन वाघ हे भूगोलाच्या वेगवेगळ्या पाच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळांवर काम करतात. डॉ. डी. बी. थोरबोले यांनी इंग्रजी विषयामध्ये अनेक शोधनिबंध लिहिलेले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगीताई गावडे, सहसचिव डॉ. युवराज भोसले. डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
फाेटाे : १२ तासगाव २