पालेभाज्या झाल्या स्वस्त, खाद्यतेलाची दरवाढ कायम कायम??????????????
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:39 AM2020-12-14T04:39:10+5:302020-12-14T04:39:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वातावरणात पुन्हा एकदा होत असलेला बदल आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वातावरणात पुन्हा एकदा होत असलेला बदल आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. या आठवड्यात पालेभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणात वाढल्याने मेथीसारखी नेहमीच चढ्या दराने मिळणारी भाजीही स्वस्त झाली आहे. तेलाच्या दरातील वाढ कायम असून बाजारात नवीन तांदूळ येत असून त्याचे दर खूपच कमी आहेत. ग्राहकांकडून वर्षासाठीची खरेदीही सुरू झाली आहे.
या आठवड्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परिणामी थंडी गायब झाली होती. थंडीमध्ये पालेभाज्यांचे उत्पादन वाढत असते. वर्षभर मेथीला मागणी असली तरी १० ते १५ रुपये जुडी असा दर कायम असतो. आता मात्र, दहा रूपयांना दोन जुडी भाजी मिळत आहे. पालक व करडई भाजीचीही आवक वाढत आहे.
किराणा मालाचे दर स्थिर असले तरी अद्याप ग्राहकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. खाद्यतेलाच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम होती. या आठवड्यात सरकी, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या प्रति किलो दरात वाढ झालेली आहे.