खुनानंतर पळून जाण्यास वापरलेली वाहने गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:25 PM2019-04-16T17:25:53+5:302019-04-16T17:29:06+5:30
शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक याचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी गायब झाल्या आहेत.
ref='http://www.lokmat.com/topics/sangli/'>सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक याचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी गायब झाल्या आहेत. नाईकचा खून होऊन आठ दिवस उलटून गेले तरी, विश्रामबाग पोलिसांनी या दोन्ही मोटारी अजूनही जप्त केलेल्या नाहीत. यातील एक मोटार पोलिसाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्षापूर्वी एका बारशाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून महेश नाईक याचा धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्रिमूर्ती कॉलनीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. नाईकचा मित्र गणेश बबलादी याच्यावरही जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित सचिन डोंगरे, सुरेश शिंदे, प्रवीण बाबर, प्रशांत सुरगाडे, सुशांत कदम, सागर म्हारनूर व मारुती शिंदे यांना अटक केली आहे. घटनेनंतर सर्व संशयित दोन आलिशान मोटारीतून पळून गेले होते. या दोन्ही मोटारी पोलिसांनी जप्त केलेल्या नाहीत. संशयितांनी त्या गायब केल्या आहेत. त्या कुठे आहेत, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक मोटार विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाºयाची आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ती खरेदी केली आहे. मात्र संशयितांकडे ही मोटार कशी आली, याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.