व्यंकाप्पा पत्की यांचा प्रवाह विरोधातील लढा प्रेरणादायी : पी. आर. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:11+5:302021-03-04T04:48:11+5:30
कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार अॅड. व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कारखाना अध्यक्ष पी. आर. पाटील, मयुरेश पत्की, विराज शिंदे, ...
कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार अॅड. व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कारखाना अध्यक्ष पी. आर. पाटील, मयुरेश पत्की, विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, अशोक वग्याणी, प्रा. बाळासाहेब मासुले, प्रदीपकुमार पाटील, एल. बी. माळी,माणिक शेळके,विजय मोरे यांनी अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : ज्येष्ठ विचारवंत, माजी आमदार अॅड. व्यंकाप्पा पत्की यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी कष्टकरी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे. त्यांची निष्ठा, अभ्यास व प्रवाहाच्या विरोधातील लढा प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर माजी आमदार व्यंकाप्पा पत्की यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात पाटील बोलत होते. सुरुवातीला पत्की यांच्या कारखाना कार्यस्थळावरील अर्ध पुतळ्याचे पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मयुरेश व्यंकाप्पा पत्की, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, प्रदीपकुमार पाटील, अशोक वग्याणी, प्रा. बाळासाहेब मासुले, संचालक एल. बी. माळी, माणिक शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.
पी. आर. पाटील म्हणाले, माजी आमदार व्यंकाप्पा पत्की हे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मोठी साथ दिली आहे. मंत्री जयंत पाटील हे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत, ते पाहून त्यांना मोठे समाधान झाले असते. पत्की सर हे उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण व प्रभावी होते. यावेळी प्रा. बाळासाहेब मासुले, अशोक वग्याणी, प्रदीपकुमार पाटील यांनीही पत्की यांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी संचालक श्रेणिक कबाडे यांनी स्वागत, संचालक विराज शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश हाके, संपतराव पाटील, दिनकर पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, व्ही. बी. पाटील, प्रेमनाथ कमलाकर, संग्राम चव्हाण,उमेश शेटे, गणेश यादव, सुशील भंडारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अभियंता विजय मोरे यांनी आभार मानले.