व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आषाढी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:27+5:302021-07-21T04:19:27+5:30
इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला. कोरोनापासून ...
इस्लामपूर : पेठनाका (ता. वाळवा) येथील व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला. कोरोनापासून मुक्ती आणि राज्यात सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या चरणी केली.
स्कूलमध्ये आषाढीचे औचित्य साधत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीचे महत्त्व कळावे. मराठी संतांच्या कार्याची माहिती व्हावी. पंढरपूरची वारी आणि दिंडीचे स्वरूप समजावे, यासाठी दिवसभर वक्तृत्व, गायन, वेशभूषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. पालकांनीही या उपक्रमात भाग घेतला.
मुलींनी रूक्मिणीची तर मुलांनी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली अशी वेशभूषा केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग आणि श्लोक म्हटले. प्राचार्य डॉ. शांती कृष्णमूर्ती व शिक्षकांनी संयोजन केले. स्कूलचे संस्थापक राहुल महाडीक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
फोटो : पेठनाका येथील व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढीनिमित्त केलेल्या वेशभूषा.