आटपाडीतील रुग्णालयाच्या अडवणुकीचा व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:53+5:302021-06-06T04:20:53+5:30
सुरेखा शिंदे (रा. दिघंची) यांना येथील श्री सेवा हॉस्पिटलमध्ये दि. ३१ मे रोजी दाखल केले. तिथे महात्मा ...
सुरेखा शिंदे (रा. दिघंची) यांना येथील श्री सेवा हॉस्पिटलमध्ये दि. ३१ मे रोजी दाखल केले. तिथे महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार करावेत, अशी नातेवाइकांची मागणी होती; पण तिथे गेल्यानंतर आधी ४० हजार अनामत भरा, मगच उपचार करू, असा तगादा लावल्याचा आरोप नवनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला.
त्यांनी मोबाइलवर तसे छायाचित्रण केले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यावर हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे की, योजनेसाठी लागणारी कोणतीही कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड न देता काही मंडळींच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक तक्रार दाखल केली आहे.
चौकटीत
भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने !
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, अशी पुरावे देऊन मागणी केली, तर भाजपने हॉस्पिटलची बाजू घेत तक्रार देणाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी केली.