कोल्हापूरसह १७ रेल्वे स्थानकांत सुरक्षेसाठी व्हिडिओ देखरेख प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:28+5:302020-12-23T04:24:28+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी व स्थानकांच्या सुरक्षिततेसाठी व्हिडिओ देखरेख प्रणाली बसविण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या रेल्वे स्थानकांवर ...
प्रवाशांच्या सोयीसाठी व स्थानकांच्या सुरक्षिततेसाठी व्हिडिओ देखरेख प्रणाली बसविण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वेकडून कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखरेख करण्यात येणार आहे. स्थानकातील प्रतिक्षागृह, आरक्षण कक्ष, वाहन पार्किंग क्षेत्र, स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, फलाट, फूट ओव्हर ब्रिजावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या १७ स्थानकांवर ही प्रणाली बसविण्यात आली आहे.
या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगले कव्हरेज व चांगली प्रतिमा मिळणार आहे. स्थानकात अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येत असून, यामध्ये चित्रीत केलेला डाटा ३० दिवस राखून ठेवण्यात येणार आहेत.
व्हिडिओ देखरेख प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, मध्य रेल्वे प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता श्रीवास्तव, रेलटेलचे प्रदेश महाव्यवस्थापक व्ही. के. अग्रवाल उपस्थित होते.
चाैकट
‘अ’ वर्गातील स्थानकांमध्ये यंत्रणा
रेलटेल कॉर्पोरेशनने कोल्हापू,र लोणावळा, अमरावती, बुरहानपूर, शेगाव, खंडवा, बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, बैतूल, अहमदनगर, लातूर, दौंड, कलबुरागी, कोपरगाव, कुर्डूवाडी आणि साईनगर शिर्डी या ‘अ’ वर्ग प्रकारात येणाऱ्या १७ स्थानकांत इंटरनेट प्रोटोकॉल आधारित व्हिडिओ देखरेख प्रणाली सुरू केली आहे.
फाेटाे : २२ मिरज १..२