दक्षता समित्यांनी जबाबदारीने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:11+5:302021-04-28T04:30:11+5:30

पलुस पंचायत समिती कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पंचायत ...

Vigilance committees should work responsibly | दक्षता समित्यांनी जबाबदारीने काम करावे

दक्षता समित्यांनी जबाबदारीने काम करावे

Next

पलुस पंचायत समिती कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते, उपसभापती अरुण पवार, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी डॉ स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर उपस्थित होते.

डूडी म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ग्राम दक्षता समिती व सरपंचांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे. गृह विलगीकरणातील रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत, हे पाहण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीची व त्या गावातील सरपंचांची असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू केली असून तेथे ऑक्सिजन बेड व अतिदक्षता बेडची सोय केली आहे. सध्या जिल्ह्यात तीन हजार ऑक्सिजन बेड तर ७०० अतिदक्षता बेडची सोय करण्यात आली आहे.

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेल्यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी गावागावातील ग्राम दक्षता समिती व सरपंचांची महत्त्वाची भूमिका आहे. ते कार्यक्षमपणे काम करीत आहेत की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधी व खातेप्रमुख अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार केले जाणार आहे. या पथकाचा सरपंच व ग्राम दक्षता समितीवर वॉच राहील.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार, डॉ अधिकराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, विकास जाधव, कैलास कोडग, संगीता माने, मुख्याधिकारी सुमित पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Vigilance committees should work responsibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.