विजया रणजित पाटील प्रकृती आयुर्वेदिक चिकित्सालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:54+5:302020-12-25T04:22:54+5:30
प्रकृती चिकित्सालयामध्ये रुग्णांवर होणाऱ्या उपचारातील सिद्धता, यश यांच्या कीर्तीमुळे आज त्यांच्याकडे केनया, सौदी अरेबिया, दुबई, कतार, ओमान, यमेन, युएसए ...
प्रकृती चिकित्सालयामध्ये रुग्णांवर होणाऱ्या उपचारातील सिद्धता, यश यांच्या कीर्तीमुळे आज त्यांच्याकडे केनया, सौदी अरेबिया, दुबई, कतार, ओमान, यमेन, युएसए या परदेशांसह देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मुंबई, कोकण अशा विविध भागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यांच्या चिकित्सालयामध्ये संपूर्ण केरळीयन बेस उपचार पद्धती दिली जाते. केरळमधील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांकडून केरळ राज्यात मिळणारी औषधे त्यांच्याकडून वापरली जातात. कुटुंब, व्यवसाय आणि मुलांचे शिक्षण अशा सर्व पातळ्यांवर पहाटे ५ वाजता सुरू होणारा त्यांचा दिनक्रम रात्री ९ वाजता संपतो. ९ ते १० तासांची दैनंदिन रुग्णसेवा त्या देतात. प्रत्येक रुग्ण हा आयुर्वेदासाठी वेगळा असतो. त्याचे प्रकृती, कोष्ठचे निदान करून त्यावर अभ्यासानंतर उपचार सुरू करतात. आजारावर मात करत स्वास्थ्याचे रक्षण करणे, हा आयुर्वेदाचा मुख्य उद्देश समोर ठेवत रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवून त्याचे आयुष्य आनंदी करण्याचा हातखंडा डॉ. विजया पाटील यांच्याकडे आहे.
त्यांच्या प्रकृती चिकित्सालयामध्ये सर्वच विकारांवर कोणतीही शस्त्रक्रिया न करता उपचार केले जातात. वात व्याधी, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, आर्थरायटिस या विकारांचे प्रमाण मोठे आहे. व्यायामाचा अभाव, विरुद्ध अन्नसेवन, विलासी जीवन जगण्याची हौस, स्थुलता यामुळे रुग्णांमध्ये विकार वाढण्याचे प्रमाण मोठे आहे. एमएनडी, जीबी सिंड्रोमा, एड्स, कर्करोग, वंध्यत्व, स्त्रीरोग अशा विविध विकारांवर अॅलोपॅथीपेक्षा आयुर्वेदामध्ये चांगले परिणाम देणारी उपचार पद्धती आहे. यावर डॉ. विजया पाटील यांचा ठाम विश्वास आहे. डॉ. पाटील यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये स्थुलता आणि मासिक पाळीच्या वाढत्या तक्रारी असणाऱ्या महिला रुग्णांची संख्याही मोठी असते. इतर रुग्णांच्या विकारांवर उपचार करणाऱ्यांबरोबरच डॉ. पाटील या महिलांच्या वाढत्या तक्रारींबाबत नेहमीच सजग असतात. महिलांमधील स्थुलता, त्यांचे राहणीमान याची माहिती घेतल्यानंतर त्या उपचाराबरोबरच मार्गदर्शन आणि प्रबोधनही करतात. या प्रदूषित जगात रुग्ण स्वस्थ कसा राहील, यासाठी त्याचे जेवण, राहणे, व्यायाम यावर लक्ष केंद्रीत करून हेल्थ रिसॉर्ट काढण्याचा डॉ. पाटील यांचा संकल्प आहे.
प्राचीन आणि अर्वाचीन आयुर्वेदात संशोधन व्हायला पाहिजे, अशी डॉ. विजया पाटील यांची इच्छा आहे. जगात सगळीकडेच वेगवेगळे नवीन व्हायरस येत आहेत. त्यामुळे अशा विषाणूंवर आयुर्वेदामधील नेमक्या उपचारांचा वापर करत विषाणूंचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल. तसेच अशा जीवघेण्या विषाणूंच्या हल्ल्यापासून रुग्णांचा बचाव कशा पद्धतीने करता येईल. यावर संशोधन करण्याची डॉ. पाटील यांची धडपड नेहमीच सुरू असते. आयुर्वेदाचा जगभरात प्रसार झाल्यामुळे या उपचार पद्धतीत चांगल्या संधी आहेत. आयुर्वेदाचार्य डॉक्टरांची मागणी वाढत आहे. आपल्या देशाची शान असणारा आयुर्वेद जगभरात पोहोचविण्यासाठी योगदान देता येईल, याचा मनस्वी आनंद डॉ. विजया पाटील यांना आहे. या आयुर्वेदामध्ये जितकं कराल तितकं कमीच आहे, ही त्यांची धारणा आयुर्वेद उपचार पद्धतीप्रती डॉ. पाटील यांना असणाऱ्या विलक्षण ओढीची निदर्शक ठरते.
डॉ. विजया पाटील यांना वडील प्राचार्य हणमंत जाधव, आई शिक्षिका स्मिता जाधव, सासू शिक्षिका सुुहासिनी पाटील, सासरे शिक्षक नेते सदाशिवराव पाटील असा सरस्वतीचे वरदान लाभलेला संपन्न वारसा मिळाला आहे. तसेच ज्यांना पाहता क्षणीच रुग्णाचा विकाराने वेदनादायी झालेला चेहरा सुहास्य वदनाने प्रफुल्लीत होतो, असे पती आयुर्वेचार्य डॉ. रणजित पाटील यांची साथ डॉ. विजया पाटील यांच्या यशोगाथेमध्ये मोलाची ठरली आहे.
- युनूस शेख