विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी विकास मगदूम
By संतोष भिसे | Published: November 25, 2022 05:04 PM2022-11-25T17:04:16+5:302022-11-25T17:05:14+5:30
१० व ११ डिसेंबरला पुणे येथे होणारे १४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार
सांगली : विद्रोही संस्कृतिक चळवळीच्या जिल्हाध्यक्षपदी विकास मगदूम आणि सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते व्ही. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत झालेल्या संघटनेच्या बैठकीत निवडी झाल्या.
यावेळी विद्रोहीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव, ॲड. सुभाष पाटील, ॲड. के. डी. शिंदे, प्रा. गौतम काटकर, सदाशिव मगदूम आदी उपस्थित होते. १० व ११ डिसेंबरला पुणे येथे होणारे १४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सांगलीतून चित्ररथांसह सहभागी होण्याचे निश्चित करण्यात आले.
चळवळीची नवी जिल्हा कार्यकारिणी अशी : सहसचिव सागर माळी, उपाध्यक्ष ज्योती अदाटे, दीपक कोठावळे, सचिन करगणे, इंद्रजीत पाटील, कार्याध्यक्ष प्रा. राम घुले, भगवान सोनंद, खजिनदार- बाळासाहेब पाटील.
अभ्यास वर्ग समन्वयक - डॉ. राजेश दांडगे, डॉ. एस. के. माने, डॉ. मिलिंद साळवे, स्नेहलता कुरणे. विद्यार्थी आघाडी जिल्हा समन्वयक - तेजस नांद्रेकर. जिल्हा संघटक - महेश माने, सुरेंद्र सरनाईक, राहुल कांबळे, प्रनंद खांडेकर. प्रसारमाध्यम विभाग प्रमुख - नौशाद मुल्ला, दीनराज वाघमारे. सदस्य - धनराज सातपुते, सुरेखा कांबळे, वैभव सरवदे, दिगंबर माळी, विठ्ठल हुलवान,
प्रा. संताजी देशमुख, मुनीर मुल्ला, बाळासाहेब मासाळ, अमर खोत, कैलास देसाई. कायम निमंत्रित - दिगंबर कांबळे, फारुक गवंडी, राजेंद्र पाटील, प्रा. लक्ष्मण शिंदे, रोहित शिंदे, स्वप्नील पाटील. नव्या कार्यकारणीचा सत्कार व्ही. वाय. पाटील, ॲड. के. डी. शिंदे, ॲड. सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला