कोतेंवबोबलाद येथील जळीतग्रस्त कुटुंबाला विक्रम सावंत यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:42+5:302021-04-08T04:26:42+5:30
संख : कोतेंवबोबलाद (ता. जत) येथील दत्ता हरीसक परीट यांच्या छप्परवजा पत्राघर, शेजारील हाॅटेलला आग लागून २ लाख ...
संख : कोतेंवबोबलाद (ता. जत) येथील दत्ता हरीसक परीट यांच्या छप्परवजा पत्राघर, शेजारील हाॅटेलला आग लागून २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले हाेते. जळीतग्रस्त कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत आ. विक्रम सावंत यांनी केली.
पूर्व भागातील कोतेंवबोबलादपासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंंतरावर अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर लगत दत्ता परीट कुटुंंबासह पत्राशेडमध्ये रहातात. राहत्या घरामध्येच हॉटेल व्यवसायही करतात.
हॉटेलसाठी दोन दिवसांपूर्वी लाॅकडाऊनमुळे जादा माल भरला होता. शनिवारी हॉटेल बंद करून ते बाहेर गेले होते. रविवारी पहाटे ४ वाजता अचानक हॉटेल व पाठीमागील खोलीला आग लागली.
आगीत रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य, गॅस, फ्रीज, कपाट, भांडी, धान्य, हॉटेलचे साहित्य जळून खाक झाले.
यावेळी रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, शंकर सावंत, सरपंच कुंडलिक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश माळी, मुरलीधर जगताप, पोलीस पाटील श्रीहरी पाटील, महादेव बिराजदार, बाळू पवार, शामू नरळे उपस्थित होते.
फोटो : ०७ संख १
ओळ : कोतेंवबोबलाद (ता. जत) येथील परीट कुटुंबाला आ. विक्रम सावंत यांनी संसारोपयोगी साहित्याची मदत केली.