कविसंमेलनात विषमतेवर प्रहार, विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : नवोदित कवींच्या ज्वलंत प्रश्नावर कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:49 AM2018-01-30T00:49:48+5:302018-01-30T00:49:55+5:30
विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते?
विटा : आम्हाला आपापसात झुंजायला लावणारे ते लोक कोण होते? माणूस मारणारे ते लोक कोण होते? सत्यास जाळणारे व सामाजात चौफळी माजविणारे ते लोक कोण होते? मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते? असे विविध सवाल करीत विटा (जि. सांगली) येथील कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी, कोरेगाव-भीमा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या सामाजिक विषमतेवर भाष्य करीत प्रहार केला.
विटा येथे रविवारी भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ३६ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सांगोलेकर बोलत होते.
कविसंमेलनाचे सरस्वतीपूजन कविता चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. मोहनराव कदम, माधुरी कदम, सुधीर कुलकर्णी, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर उपस्थित होते.
कविसंमेलनात सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपुजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, स्वाती शिंदे-पवार, बबुताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दीपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवे, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, नीशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ हुसेन मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चंद्रवर्धन लांडगे, चंद्रकांत कान्हेरे, अमर गंगथडे, नवनाथ आडे, कृष्णा काळे, प्रा. दिनकर जगदाळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, अर्चना लाड, शाहीर पाटील, बाबूराव शेळके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, गौतम कांबळे, डॉ. अंजली रसाळ, देविका दिवटे, प्राची मेटकरी, दादा सावंत या कवींनी कविता सादर केल्या. त्यांच्या कविताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक, तर रघुराज मेटकरी यांनी स्वागत केले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी आभार मानले.
सामाजिक : विषय
भारतमाता ज्ञानपीठ साहित्य सेवा मंडळ व मुक्तांगण वाचनालयाच्यावतीने आयोजित या कविसंमेलनात विविध निमंत्रित कवींनी स्त्री-भूणहत्या, राष्टÑीय एकात्मता, राजकारण, महागाई, आरक्षण, जातीय तंटे यासारख्या अनेक सामाजिक विषयांना स्पर्श करणाºया कविता सादर केल्या. याला उपस्थित श्रोत्यांकडून चांगलीच दाद मिळाली.
विटा येथे रविवारी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रसिध्द गजलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कवयित्री सौ. स्वाती शिंदे-पवार, कवी सुधीर इनामदार, योगेश्वर मेटकरी उपस्थित होते.