घरकुलाच्या लाभासाठी अधिकाऱ्यांच्या गावनिहाय बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:24+5:302021-03-04T04:48:24+5:30
शेगाव : जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी घरकुल संदर्भात दरीबडची गटात मेळावा घेतला. गटातील दरीकोणूर, सिद्धनाथ, पांढरेवाडी, कागनरी, ...
शेगाव : जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी घरकुल संदर्भात दरीबडची गटात मेळावा घेतला. गटातील दरीकोणूर, सिद्धनाथ, पांढरेवाडी, कागनरी, पांडोझरी, तिकोंडी, करेवाडी, मोटेवाडी या गावांत रमाई घरकुल, इंदिरा आवास, वसंत घरकुलासाठी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
यावेळी जत पंचायत समितीचे अभियंता बसवराज जनगोंड, रोजगार हमीचे रोहित पाटील, सुनील सरगर आणि विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य सरदार पाटील म्हणाले की, शासनाने सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी रमाई घरकुल, पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास, वसंत घरकुल या योजना अंमलात आणल्या आहेत. घरकुल योजना पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. ज्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला अशा लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम लवकर द्यावी. नवीन लाभार्थ्यांनी येत्या मार्चपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे व शिल्लक कामे पूर्ण करावीत.