म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संतोष भिसे | Published: June 12, 2023 07:12 PM2023-06-12T19:12:08+5:302023-06-12T19:13:40+5:30

सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

Villagers of eight villages stood in front of the collector office in Sangli for Mhaisal water | म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

googlenewsNext

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेच्या बिळूर (ता. जत) कालव्याचे अर्धवट रखडलेले काम त्वरित सुरु करावे यासाठी बिळूरसह आठ गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपासून सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरु केले. निर्णय होईपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.

बिळूर व पंचक्रोशीतील गुगवाड, वज्रवाड, खिलारवाडी, एकुंडी, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, मिरवाड या गावांना हा कालवा वरदान ठरणार आहे. कालव्याचे काम अर्धवट झाले असून पूर्ण व्हावे यासाठी ग्रामस्थ दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार ही गावे  'अतिशोषित' वर्गवारीत येतात. त्यामुळे तेथे विहीर खोदण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. त्यामुळे सिंचन योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. कालव्याचे अर्धवट काम अवघ्या काही तासांत पूर्ण होऊ शकते, पण प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. काम तातडीने पूर्ण करुन ओढे, नाल्यांत पाणी सोडावे.

आंदोलनात बसगोंडा नाईक, मलगोंडा हेळकर, मलगोंडा कोट्टलगी, प्रकाश बिरादार, चिदानंद चौगुले, बाबाण्णा नाईक, श्रीमंत गुडोडगी, शिवपूत्र नाईक, प्रकाश हेळकर, श्रीशैल कुल्लोळी, रायगोंडा पाटील आदी सहभागी झाले आहेत.

अवघे २०० फुटांचे खोदकाम रखडले

आंदोलकांनी सांगितले की, डफळापूर हद्दीत कालव्याचे अवघे १०० ते २०० फूट मध्ये काम शिल्लक आहे, त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकत नाही. डोळ्यांसमोर पाणी असतानाही मिळत नसल्याने वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन व योजनेच्या व्यवस्थापनाला यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आहेत, पण सकारात्मक कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Villagers of eight villages stood in front of the collector office in Sangli for Mhaisal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.