टाकळीत निकृष्ट दर्जाच्या जलवाहिनीचे काम ग्रामस्थांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:03+5:302021-01-08T05:27:03+5:30
मिरज-सलगरे राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाची रुंदी वाढल्याने टाकळी गावासाठी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम ठेकेदारांकडून ...
मिरज-सलगरे राज्य महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाची रुंदी वाढल्याने टाकळी गावासाठी पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम ठेकेदारांकडून सुरू आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून टाकळी व सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राज्य महामार्गाच्या ठेकेदाराकडून सुमारे दीड किलोमीटर टाकळीतील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची जलवाहिनी वापरण्यात आल्याने वारंवार जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा खंडीत होत आहे, याबाबत ग्रामपंचायतीकडून ठेकेदारास वारंवार सूचना देऊनही सोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याने मंगळवारी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, सरपंच महेश मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे, प्रवीण कोरे, ऑगस्ट कोरे, अनिल लोखंडे, सचिन पाटील, अभिजित पाटील, अरुण गडकरी, सोसायटीचे अध्यक्ष महादेव गुरव सुनील पाटील, राकेश लोंडके यांच्यासह ग्रामस्थांनी जलवाहिनीचे सुरू असलेले काम रोखून उत्तम दर्जाची जलवाहिनी बसविण्याची मागणी केली. याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
फाेटाे : ०५ टाकळी २