ग्रंथालय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी विनायक कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:46+5:302021-02-24T04:27:46+5:30
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे नूतन तालुकाध्यक्ष विनायक कदम यांचा सत्कार करताना विजयबापू पाटील. समवेत बाळासाहेब पाटील, संजय ...
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे नूतन तालुकाध्यक्ष विनायक कदम यांचा सत्कार करताना विजयबापू पाटील. समवेत बाळासाहेब पाटील, संजय पाटील, प्रा. कृष्णा मंडले, डॉ.अशोक पाटील व मान्यवर.
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या वाळवा तालुकाध्यक्षपदी विनायक कदम (घबकवाडी), उपाध्यक्ष इम्तियाज मुन्शी (आष्टा), राहुल खोत (पडवळवाडी), सरचिटणीस अमित कुमार कोळेकर (कारंदवाडी), चिटणीस दिनकर गावडे (जुनेखेड), कोषाध्यक्ष पांडुरंग पाटील (कासेगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले, प्रदेश सरचिटणीस डॉ. अशोक पाटील यांनी या निवडी जाहीर केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पार्वती पवार यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तालुका कार्यकारिणी सदस्य- रमेश पाटील, भडकंबे, मानसिंग जगताप, किल्ले मच्छिंद्रगड, कुमार कापसे, रेठरे धरण, झहूर पटवेकर, इस्लामपूर, रमेश पाटील, मर्दवाडी, संजय मोरे, रेठरेहरणा, अजित सावंत, ताकारी, कुंजलता पाटील, येडेमच्छिंद्र, कविता पांढरपट्टे, जांभूळवाडी.
जिल्हा कार्यकारिणी सदस्य-अजित पाटील, ओझर्डे, धनाजी देसावळे, कोरेगाव, सल्लागार डी. जी. खोत (सर), माणिकवाडी, के.के. पाटील, तांबवे, विजयकुमार कदम (सर) कुंडलवाडी.
विजयबापू पाटील म्हणाले, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्री असताना राज्यातील ग्रंथालयांना भरीव निधी दिला असून, आपणास सातत्याने सहकार्य आहे. आपण आपल्या विभागाचे मजबूत संघटन करून आपले प्रश्न सोडवा. आमचे पूर्ण सहकार्य राहील. प्रा. कष्णा मंडले म्हणाले, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गाव तेथे वाचनालय हा उपक्रम राबविणार आहोत. वाळवा तालुक्यात ग्रंथालय सेल उत्कृष्ट काम करेल. ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. यावेळी नूतन अध्यक्ष विनायक कदम, उपाध्यक्ष इम्तियाज मुन्शी, अमितकुमार कोळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रदेश सरचिटणीस डॉ. अशोक पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा सदस्य प्रा. अजित पाटील यांनी आभार मानले.