सागावमध्ये विलगीकरणाचा भंगप्रकरणी काेराेनाबाधित रुग्णावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:24 AM2021-04-19T04:24:55+5:302021-04-19T04:24:55+5:30

शिराळा : सागाव ( ता. शिराळा) येथे कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षात न थांबता परगावी गेल्याचे आढळून आल्याने त्याच्याविराेधात शिराळा ...

Violation of segregation in Sagav | सागावमध्ये विलगीकरणाचा भंगप्रकरणी काेराेनाबाधित रुग्णावर गुन्हा

सागावमध्ये विलगीकरणाचा भंगप्रकरणी काेराेनाबाधित रुग्णावर गुन्हा

Next

शिराळा

: सागाव ( ता. शिराळा) येथे कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षात न थांबता परगावी गेल्याचे आढळून आल्याने त्याच्याविराेधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी दिली.

शासनाच्या ब्रेक द चेन माेहिमेंतर्गत संचारबंदी लागू आहे. शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. विनाकारण दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन गावांमध्ये फिरणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी ६ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सागांव येथील एक कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात न थांबता परगावी गेल्याने त्याच्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कांदे येथील अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेली दुकाने सुरू ठेवल्याने दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Violation of segregation in Sagav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.