विश्वजित कदम यांची विधानसभेवर बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 09:25 AM2018-05-31T09:25:07+5:302018-05-31T09:25:07+5:30
पलुस-कडेगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
सांगली - पलुस-कडेगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या संग्रामसिंह देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे विश्वजित कदम यांची विधानसभेवरील बिनविरोध निवड तेव्हाच निश्चित झाली होती. अखेर आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव यांच्या निधनामुळेपलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपानेही या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारीची मुदत संपायला केवळ पंधरा मिनिटे राहिली असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याचवेळी विरोधातील सर्व सात जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.