आविष्कार कल्चरल ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ पाटसुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:14+5:302021-04-15T04:25:14+5:30
इस्लामपूर येथे आविष्कारचे नूतन सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड यांचा सत्कार डी. बी. पाटील, सचिन पाटील यांच्या हस्ते ...
इस्लामपूर येथे आविष्कारचे नूतन सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड यांचा सत्कार डी. बी. पाटील, सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी मोहन चव्हाण, सुनील चव्हाण, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. कृष्णा मंडले, भूषण शहा, सतीश पाटील, बालाजी पाटील, राजवर्धन लाड, धनंजय भाेसले, लव्हाजी देसाई, अजय थोरात आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांस्कृतिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आविष्कार कल्चरल ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ मारुती पाटसुते तर सहसचिवपदी विजय पांडुरंग लाड यांची निवड करण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार कल्चरल ग्रुपला अधिक गतिमान करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
आविष्कारचे प्रमुख कार्यकर्ते मोहन चव्हाण, सहसचिव प्रा. कृष्णा मंडले यांनी या निवडी जाहीर केल्या. आविष्कारचे संस्थापक सचिव राजेंद्र घोरपडे यांच्या अकाली जाण्याने सचिवपद रिक्त झाले होते.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक डी. बी. पाटील, आविष्कारचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, सतीश पाटील, बालाजी पाटील, राजवर्धन लाड यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय भाेसले, लव्हाजी देसाई, अजय थोरात उपस्थित होते.