मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरभेटी, फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:07 AM2019-08-24T11:07:46+5:302019-08-24T11:13:34+5:30

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरभेटी दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी केले.

Visit the polling station officer | मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरभेटी, फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरभेटी, फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना

Next
ठळक मुद्देमतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना घरभेटी दरम्यान सहकार्य कराउपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांचे आवाहन

सांगली : मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरभेटी दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी यावेळी केले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने 282 सांगली विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी बैठक घेण्यात आली.  

या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, 282 सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षक यांना माहे जुलै ते सप्टेंबर 2018 मध्ये वगळणी केलेल्या मतदारांपैकी स्थलांतरित मतदारांशी संपर्क साधून घरभेटी देऊन त्यांच्या रहिवासाबाबत खात्री करुन त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी फॉर्म नं 6 भरुन घेण्याच्या सूचना दिल्या.

जे मतदार नमूद पूर्वीच्या राहत्या ठिकाणी आढळून येत नाहीत त्यांना विहित कार्यपध्दती अनुसरुन नोटीस बजावण्यात यावी व साक्षीदारांच्या समक्ष पंचनामा करावा. त्यानुसार पुर्तता अहवाल 30 ऑगस्ट अखेर जिल्हा पुरवठा कार्यालय सांगली येथे सादर करावा.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्राप्त झालेले निवडणूक ओळखपत्र यांचे योग्य मतदाराला वाटप करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
 

Web Title: Visit the polling station officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.