विटा : तरूणांना नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:24 PM2024-07-15T13:24:39+5:302024-07-15T13:28:00+5:30

तीन संशयित गजाआड : विटा पोलीसांची दमदार कारवाई

Vita A gang that sells injectable drugs to youth busted | विटा : तरूणांना नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विटा : तरूणांना नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विटा : शरीरसौष्ठव वाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणाचा विटा पोलीसांनी रविवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलीसांनी दिलीप बाबूराव ठोंबरे (वय ४८, रा. नेहरूनगर, विटा), सुशांत हिंदूराव जाधव (वय २७, रा. पुणदी रोड, तासगाव, मूळगाव हातनोली) व अमरदिप रामचंद्र भंडारे (वय ४०, रा. कार्वे, ता.खानापूर) या तिघांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातील मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ८ हजार रूपये किंमतीच्या १६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या.

विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीरसौष्ठव वाढत असल्याचे सांगून तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाऊंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या १६ सीलबंद बाटल्या सापडल्या.

त्यावेळी पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाºया सुशांत जाधव व अमरदिप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे पोलीसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून तर अमरदिप भंडारे याला कार्वे येथून ताब्यात घेऊन अटक केली. विटा पोलीसांनी तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला आहे. मात्र, हे इंजेक्शन संशयित तीघेजण कोठून खरेदी करीत होते, याचा मुख्य तपास करून त्यांच्याही मुसक्या आवळण्याचे विटा पोलीसांसमोर आव्हान आहे.

इंजेक्शनचा दुष्पपरिणाम काय?

मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा वापर हा हद्यदाब वाढविण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्यांचे दुष्पपरिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यू ही होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.

Web Title: Vita A gang that sells injectable drugs to youth busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.