दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावला विटेकर ग्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:38+5:302021-07-30T04:28:38+5:30
फोटो - २८०७२०२१-विटा-मदत : विटा येथील युवकांनी कोयनानगर दरडग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दरडग्रस्तबाधितांना मदतीचा हात दिला. लोकमत न्यूज ...
फोटो - २८०७२०२१-विटा-मदत : विटा येथील युवकांनी कोयनानगर दरडग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दरडग्रस्तबाधितांना मदतीचा हात दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : गेल्या आठवड्यात कोयनानगर परिसरातील डोकावळे गावाशेजारी दरड कोसळल्याने तात्पुरते पुनर्वसन केलेल्या ३०० लोकांच्या मदतीसाठी विटा येथील तरुण सरसावले. आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व राजलक्ष्मी मित्रपरिवाराने त्यांना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. युवकांनी तेथील लोकांना स्वेटर, ब्लँकेट व खाद्यपदार्थ साहित्याचे वाटप केले.
कोयनानगरजवळील डोकावळे गावाशेजारी अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. त्यामुळे तेथील सुमारे ३०० लोकांना शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तेथेच त्यांची राहण्याची सोय करण्यात आली; परंतु त्यांचे साहित्य घरातच अडकून पडल्याने त्यांना झोपण्यासाठी ब्लँकेट व थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरची आवश्यकता होती.
आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे माधव रोकडे, अमित भोसले, विकास जाधव, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, शंकर बुधवाणी, मिकी सिंधी, रूपेश आहुजा, विनोद पाटील, पांडुरंग पवार, संभाजी होगले, जगन्नााथ पाटील, रोहित कुमठेकर, धाबुगडे यांच्यासह युवकांनी डोकावळेवासीयांना ब्लँकेट, स्वेटर, कानटोप्या, बिस्कीट, कपडे, सॅनिटायझर आदी साहित्याचे वाटप केले.