विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?, गौरव नायकवडींच्या स्टेट्समुळे इस्लामपूर मतदारसंघात चर्चेला उधाण

By श्रीनिवास नागे | Published: June 29, 2023 06:29 PM2023-06-29T18:29:47+5:302023-06-29T18:31:42+5:30

महेंद्र किणीकर वाळवा : हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गाैरव नायकवडी यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ...

Vitthala, which flag to take? Political discussion in Islampur constituency due to Gaurav Nayakwadi status | विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?, गौरव नायकवडींच्या स्टेट्समुळे इस्लामपूर मतदारसंघात चर्चेला उधाण

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?, गौरव नायकवडींच्या स्टेट्समुळे इस्लामपूर मतदारसंघात चर्चेला उधाण

googlenewsNext

महेंद्र किणीकर

वाळवा : हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गाैरव नायकवडी यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ हे गीत व्हॉट्सॲपवरील स्टेट्सला ठेवले आहे. गुरुवारी आषाढी एकादशीस ते व्हायरल झाल्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.

गौरव नायकवडी सध्या हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष आणि राज्य धरण व शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. नागरिकांच्या संपर्कात राहणारा, धरणग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेली चार वर्षे गौरव नायकवडी राष्ट्रवादीच्या विरोधात असले तरी सर्व पक्षांपासून अलिप्त आहेत. भाजप-शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांसोबत ते असतात. 

परंतु आज, त्यांनी ठेवलेले व्हॉट्सॲपचे स्टेटस व्हायरल झाले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबतचे स्वत:चे छायाचित्र आणि ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?’ हे गीत त्यांनी व्हॉट्सॲपवरील स्टेट्सला ठेवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते कोणाचा झेंडा खांद्यावर घेणार, याबाबत चर्चा रंगली आहे.  

Web Title: Vitthala, which flag to take? Political discussion in Islampur constituency due to Gaurav Nayakwadi status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.