पेठच्या कुस्ती मैदानात विवेक नायकल विजयी- : शाहू पाटीलला दाखविले अस्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:45 PM2019-03-13T22:45:51+5:302019-03-13T22:46:12+5:30
पेठ (ता. वाळवा) येथील श्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण व पेठ गावचा मल्ल विवेक नायकल याने एकलंगी डावावर
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील श्री मल्हारी माणकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण व पेठ गावचा मल्ल विवेक नायकल याने एकलंगी डावावर कोल्हापूरच्या शाहू पाटील याला चितपट केले. अवघ्या अडीच मिनिटात अस्मान दाखवत विवेक हा आत्मा माणकेश्वर-खंडेश्वर केसरीच्या चांदीच्या गदेचा व महाडिक केसरीचा मानकरी ठरला.
चिंचोलीचे सुरेश जाधव यांच्या समालोचनाने मैदानात रंगत आली. मैदान पूजन माणिकराव जाधव, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, उपसरपंच शंकर पाटील, धनपाल माळी, अशोक मस्के, नामदेव भांबुरे यांच्याहस्ते झाले.
मैदानात क्रमांक दोनची कुस्तीत अमर पाटील (माणिकवाडी) याने पुण्याच्या शेखर दोडके यांच्यावर गुणाने विजय मिळवला. जाधव आखाड्याचा संजय जाधव याने शाहू आखाड्याचा मल्ल स्वप्नील पाटील याला चितपट केले. सुरूलचा राहुल पाटील याने शाहू आखाड्याच्या संतोष रूपनवर याच्यावर मात केली. मिल्ट्री स्कूल बॉईजचा खेळाडू अतुल नायकल याने निखिल सपकाळचा पराभव केला सागर पवार (पेठ) याने प्रणव चव्हाण (इस्लामपूर) याला चितपट केले.
मैदानाचे नियोजन व पंच म्हणून कृष्णात पवार, सुबराव पाटील, आप्पासाहेब कदम, विठ्ठल माळी, दत्ता गावडे, हिंदुराव कदम, गोरख मदने, नामदेव भांबुरे, आकाराम नायकल, हणमंतराव कदम, चंद्रकांत पवार, महेश कोळेकर, भानुदास गुरव यांनी काम पाहिले.
श्रद्धाची बाजी
महिला कुस्तीत औंढीची साक्षी जाधव व श्रध्दा सावंत (काळामवाडी) यांच्यातील लढतीत श्रध्दा विजयी झाली. तसेच पवारवाडीची संध्या डिसले व भाटवडेची ऋतुजा जाधव यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.