‘विवेकानंद’च सांघिक विजेता वेणुताई चव्हाण, कॉमर्स कॉलेजला वैयक्तिक विजेतेपद : लोकनृत्यात आजरा महाविद्यालयाची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:29 AM2018-11-03T00:29:40+5:302018-11-03T00:32:45+5:30

विविध कलाप्रकारांमध्ये दमदार सादरीकरण करीत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सलग अकराव्या वर्षी सांघिक सर्वसाधारण विजेतेपद शुक्रवारी पटकाविले.

 'Vivekananda' team winner Venutai Chavan, commerce college win individual title: A college admission in folk dance | ‘विवेकानंद’च सांघिक विजेता वेणुताई चव्हाण, कॉमर्स कॉलेजला वैयक्तिक विजेतेपद : लोकनृत्यात आजरा महाविद्यालयाची बाजी

‘विवेकानंद’च सांघिक विजेता वेणुताई चव्हाण, कॉमर्स कॉलेजला वैयक्तिक विजेतेपद : लोकनृत्यात आजरा महाविद्यालयाची बाजी

Next

संतोष मिठारी/ शरद जाधव ।
सांगली : विविध कलाप्रकारांमध्ये दमदार सादरीकरण करीत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सलग अकराव्या वर्षी सांघिक सर्वसाधारण विजेतेपद शुक्रवारी पटकाविले. कोल्हापुरातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स आणि कºहाडच्या वेणुताई चव्हाण कॉलेज यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद विभागून मिळविले.

 

वाईच्या किसनवीर महाविद्यालयाने लोककला प्रकारातील विजेतेपद मिळवून बाजी मारली. आजरा महाविद्यालय सलग दुसऱ्यावर्षी लोकनृत्यामध्ये अव्वल ठरले. विजेत्या संघांना सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघातील विद्यार्थी कलाकार, समर्थकांनी विजयी घोषणा देत, वाद्यांच्या दणदणाटात नृत्याचा फेर धरत आनंद व्यक्त केला.

गेल्या तीन दिवसांपासून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात रंगलेल्या विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची सांगता शुक्रवारी जल्लोषात झाली. विवेकानंद कॉलेजला सांघिक विजेतेपदासाठी ‘अभिजितदादा कदम मेमोरियल चषक’ देऊन गौरविण्यात आले. कॉमर्स कॉलेज आणि वेणुताई चव्हाण कॉलेजला वैयक्तिक स्पर्धेसाठी असणारा ‘माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार फिरता चषक’ विभागून देण्यात आला. किसनवीर महाविद्यालयाला लोककलेसाठीचा ‘सरदार बाबासाहेब माने’ हा फिरता चषक प्रदान करण्यात आला. लोकनृत्यामध्ये अव्वल ठरलेल्या आजरा महाविद्यालयाला ‘सरदार दादासाहेब माने’ हा फिरता चषक देण्यात आला.
या कार्यक्रमास किशोर पंडित, शहाजी पवार, राजकुमार पाटीलआदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी स्वागत केले. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी निकालाचे वाचन केले.

स्पर्धानिहाय विजेते...
(विजेत्यांची नावे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी) : लोकवाद्यवृंद : देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय (चिखली), मुधोजी महाविद्यालय (फलटण), विवेकानंद कॉलेज, कॉमर्स कॉलेज, किसन वीर महाविद्यालय. भारतीय समूहगीत : मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय (कडेगाव), विवेकानंद कॉलेज, शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग. पाश्चिमात्य समूहगीत : विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय (सरूड).

लोककला (विजेत्यांची नावे द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ) : दत्ताजीराव कदम आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (इचलकरंजी), मुधोजी महाविद्यालय, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (यड्राव), सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगूड). लोकनृत्य : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (सातारा), विवेकानंद कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (उरूण-इस्लामपूर), नाईक महाविद्यालय (चिखली), शिवशाहू महाविद्यालय.

युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी विद्यापीठाच्या संघाने राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेली कव्वाली सादर केली.

महोत्सवाकडे कुलगुरूंची पाठ
महाविद्यालय आणि विद्यापीठाच्यादृष्टीने मध्यवर्ती युवा महोत्सवाचे एक वेगळे महत्त्व आहे. महोत्सवासाठी विद्यार्थी जोमाने तयारी करतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासह त्यांना शाबासकी देण्यासाठी कुलगुरूंनी उपस्थित राहणे महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, यावर्षीच्या मध्यवर्ती महोत्सवादरम्यान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे एकदाही
आले नाहीत. त्यामुळे त्यांनी महोत्सवाकडे पाठ फिरविल्याची चर्चा महोत्सवादरम्यान होती.

‘रावल्या’ ठरला आकर्षण
अभिनेता राहुल मगदूम, चित्रपट दिग्दर्शक धोंडिबा कारंडे या कार्यक्रमावेळी आकर्षण ठरले. त्यांनी युवा महोत्सवातील आठवणी सांगत तरूणाईशी संवाद साधला.

युवा महोत्सवाचा समारोप उत्साहात
एकपात्री अभिनय, प्रश्नमंजुषा; तरुणाईची शेवटच्या दिवशीही धम्माल
सांगली : येथील विलिंग्डन महाविद्यालयात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा तिसरा दिवस आपल्या बहारदार सादरीकरणाने तरुणाईने गाजविला. महोत्सवात शुक्रवारी सकाळपासून एकपात्री अभिनय, प्रश्नमंजुषा, स्पॉट फोटोग्राफी, स्थळ चित्रणात तरुणाई रमली.

 

महोत्सवातील शेवटच्या दिवसाची सुरुवात सकाळी दहा वाजता एकपात्री अभिनय कलाप्रकाराने झाली. विशेष म्हणजे यात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी स्त्री-भ्रूणहत्या, भ्रष्टाचार, महागाई आदी सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत भारतीय इतिहास, चालू घडामोडी, कला, सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे देताना स्पर्धकांचा कस लागला. स्पॉट फोटोग्राफी आणि स्थळ चित्रण कलाप्रकारात सहभागी स्पर्धकांनी महाविद्यालयाची ऐतिहासिक इमारत, निसर्गरम्य परिसर चित्र आणि कॅमेराबध्द केला.


विद्यापीठ संघाचे लक्षवेधक सादरीकरण
रायपूर (छत्तीसगढ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या संघाने महोत्सवाच्या समारोपावेळी ‘ढोलूकुनीता’ हे कर्नाटकी धनगर नृत्य सादर केले. गेल्या आठवड्यात विद्यापीठात झालेल्या राष्टÑीय कव्वाली स्पर्धेतील विजेत्या शिवाजी विद्यापीठाच्या संघाने बहारदार कव्वालीचे सादरीकरण केले. या संघाच्या लोकसंगीत वाद्यवृंदाने समारोपाच्या कार्यक्रमात रंगत आणली.
‘इंद्रधनुष्य’साठी आजपासून निवड चाचणी
यंदाच्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय महोत्सव आणि पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी विद्यापीठ संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची निवड चाचणी आज, शनिवारी आणि रविवारी (दि. 3, ४ नोव्हेंबर) विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी केले.

सांगली येथे शुक्रवारी विलिंग्डन महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात कºहाडच्या वेणुताई चव्हाण महाविद्यालयाने वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. दुसºया छायाचित्रात वाङ्मय विभागातील विजेतेपद मिळविणारे कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालय तर तिसºया छायाचित्रात लोककला प्रकारातील फिरता चषक मिळविणारे किसनवीर महाविद्यालय. या महाविद्यालयीन संघांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शेजारी महेश काकडे, आ. सुधीर गाडगीळ, खा. संजय पाटील, किशोर पंडित, प्राचार्य भास्कर ताम्हणकर आदी उपस्थित होते.


सांगली येथे शुक्रवारी विलिंग्डन महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी विद्यापीठाच्या संघाने ‘ढोलूकुनीता’ हे कर्नाटकी धनगरी नृत्य सादर केले.

 

फिरत्या गौरव चषकाचे मानकरी...
विलिंग्डन महाविद्यालयाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध पाच विभागांमध्ये यावर्षीपासून फिरते गौरव चषक शिवाजी विद्यापीठाला दिले. कला विभागनिहाय या चषकांचे मानकरी ठरलेली महाविद्यालये अशी : नृत्य विभाग : आजरा आणि किसनवीर महाविद्यालय. नाट्य आणि संगीत : विवेकानंद कॉलेज. कला : कॉमर्स कॉलेज. वाङम्य : डी. पी. भोसले कॉलेज (कोरेगाव).

सलग अकरा वर्षे सांघिक विजेतेपदाचे श्रेय विद्यार्थ्यांना
सलग ११ व्या वर्षी आमच्या महाविद्यालयाने सांघिक विजेतेपदावर युवा महोत्सवात नाव कोरले आहे. त्याचे श्रेय विद्यार्थ्यांना आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या पाठबळावर विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.
- एस. वाय. होनगेकर, प्राचार्य, विवेकानंद कॉलेज

Web Title:  'Vivekananda' team winner Venutai Chavan, commerce college win individual title: A college admission in folk dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.