सांगली चेंबर ऑफ कॉमर्ससाठी दुरंगी लढत; 'या' तारखेला होणार मतदान
By अशोक डोंबाळे | Published: September 25, 2023 06:57 PM2023-09-25T18:57:38+5:302023-09-25T18:58:57+5:30
व्यापाऱ्यांचे दोन गट आमने-सामने
सांगली : सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी २६ जणांचे उमेदवारी अर्ज राहिले. यात मावळत्या संचालक मंडळातील अध्यक्ष शरद शहा यांच्यासह आठ माजी संचालकांचा समावेश आहे. 'चेंबर'ची निवडणूक व्यापाऱ्यांच्या दोन गटात चुरशीची होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारांना ३० सप्टेंबरला चिन्ह वाटप असून १० ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी पूर्वी संपलेला आहे. कोरोना आणि महापुराच्या कारणांमुळे चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक लांबली होती. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाकडून कामकाज सुरू होते. आता निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून रमणिक दावडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे.
त्याशिवाय बाजार समिती निवडणुकीत चेंबरच्या उमेदवारांच्या विरोधात उघड भूमिका घेतलेले व चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक पाटील, अभय मगदूम यांचेही चेंबरची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून ३६५ मतदार संख्या आहे. १३ जागांसाठी ३३ जणांचे ३८ अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी सातजणांनी माघार घेतली. त्यामुळे १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यात मावळत्या संचालक मंडळातील अध्यक्ष शरद शहा यांच्यासह दीपक चौगुले, समीर साखरे, गोपाळ मर्दा या विद्यमान संचालकांचा समावेश आहे.
पात्र उमेदवारांची यादी उद्या प्रसिध्द
पात्र उमेदवारांची यादी बुधवार दि. २७ रोजी जाहीर होणार आहे. ३० सप्टेंबरला चिन्ह वाटप आणि १० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 'चेंबर'ची आतापर्यंत बिनविरोध निवडणूक झाली आहे. यंदा मात्र प्रथमच सर्वच जागांवर निवडणूक लागली आहे.