नऊ ग्रामपंचायतींमध्ये एक-दोन जागांसाठीच होणार मतदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:32+5:302021-01-13T05:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता प्रत्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता प्रत्यक्ष प्रचारात रंगत वाढली आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्षात मतदान होणार असताना जिल्ह्यातील नऊ ठिकाणी एक दोन जागांसाठीच मतदान घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील १५२ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर तांत्रिक कारणाने अर्ज माघार घेण्यास उशीर झाल्याने आता काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. यात आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथे एका जागेसाठी निवडणूक होत आहे , तर कवठेमहांकाळ तालुक्यात मोघमवाडी बिनविरोध झाली असताना, रायवाडी व तिसंगी येथे प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. बनेवाडी येथेही २ जागा बिनवरोध झाल्या आहेत. जत तालुक्यात लमाणतांडा (उटगी) येथे व लमाणतांडा (दरीबडची) येथे एक जागा, तर तिकोंडी येथे तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. यासह जिल्ह्यातील काही गावांत त्या प्रवर्गाचा व्यक्ती नसतानाही आरक्षण पडल्याने तांत्रिकदृ्ष्टया निवडणूक होत आहे. वाळवा तालुक्यात तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. तासगाव तालुक्यातही अशी लढती होत आहेत.
चौकट
तांत्रिक कारणाने लागल्या निवडणुका
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण घोषित करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यात काही गावांत त्या प्रवर्गाचे एकही कुटुंब नसताना आरक्षण जाहीर केले जाते. त्यामुळे तांत्रिक कारणाने निवडणूक होत आहेत. यामुळे आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी, धावडवाडी, बोंबेवाडीसारख्या गावात अनेक वर्षे सदस्यांचा कोरम पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे यंदाही होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तांत्रिक कारणाने प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.